एम् ए संस्कृत- वर्ष 2रे - मुम्बई विद्यापीठ : पेपर 8 यूनिट 3 : वाङ्मयीन समीक्षेचे सिद्धांत
(short forms : म्हू० = म्हणून, म्हे० = म्हणजे)
Lecture 1 : 06 july 2010
वाङ्मयीन समीक्षेचे जे काही सिद्धांत प्राचीन भारतीय संस्कृत साहित्यकारांनी प्रस्थापित केले, त्या सिद्धांतांचा अभ्यास आपल्याला इथे करायचा । संस्कृत साहित्यात वाङ्मयीन समीक्षा ज्या शास्त्रात समाविष्ट आहे त्या शास्त्राला 'साहित्यशास्त्र', 'काव्यशास्त्र' किंवा 'अलंकारशास्त्र' असे म्हणतात ।
या शास्त्राला ही नावे कशी मिळाली त्याबद्दल पाहू । √ कु = बोलणे, म्हणणे । जो बोलतो, म्हणतो, तो कवि । कवेः इदम् इति काव्यम् । 'कवि'शी सम्बन्धित जे, ते काव्य । काव्याचे दोन घटक : शब्द आणि अर्थ । शब्दाचे आणि अर्थाचे साहचर्य म्हे० साहित्य ।
'सहितस्य भावः साहित्यम्' , 'शब्दार्थौ काव्यम्' , 'शब्दार्थौ सहितौ काव्यम्' असे म्हटले जाते.
काव्य/साहित्याविषयी महिती देणारे शास्त्र म्हे० काव्यशास्त्र /साहित्यशास्त्र ।
अलङ्कार = सौन्दर्य ।
कवीने सौन्दर्य कसे निर्माण करावे व रसिकाने ते कसे अनुभवावे हे सांगणारे शास्त्र म्हे० अलङ्कार शास्त्र ।
कवीला उत्तम काव्यनिर्मितीसाठी व रसिकाला उत्तम रसग्रहणासाठी मार्गदर्शन करणे हे काव्यशास्त्राचे प्रयोजन ।
'साहित्यशास्त्र', 'काव्यशास्त्र' किंवा 'अलङ्कारशास्त्र', ही एकाच शास्त्राची तीन नावे आहेत ।
काव्याचे प्राथमिक आणि सर्वश्रेष्ठ प्रयोजन म्हे० आनन्द । कवीचे कार्य आनन्दनिर्मिती आणि रसिकाचे कार्य आनन्दानुभव । आनन्द कशातून मिळतो ? आस्वादातून । आस्वाद कशाचा ? सौन्दर्याचा । सौन्दर्याशिवायचे काव्य हे निव्वळ लिखाण ठरेल । सौन्दर्यनिर्मिती कशातून होते ? शब्दांची निवड, त्याची अर्थाशी वैशिष्ट्यपूर्ण सांगड, अलङ्कार, विशिष्ट रचना इ० अनेक साधनंनी सौन्दर्य निर्माण होते । 'या साधनांपैकी सगळ्यात महत्त्वाचे साधन कोणते?' या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक शास्त्रकाराने वेगवेगळे दिले आहे । त्या उत्तरातूनच काव्यशास्त्राच्या निरनिराळ्य शाखा किंवा सिद्धान्त निर्माण झाले
अशाप्रकारे निर्माण झालेले काव्यशास्त्राचे पांच महत्त्वाचे सिद्धान्त खालीलप्रमाणे आहेत :
अलङ्कार-सिद्धान्त
गुणारीति-सिद्धान्त
वक्रोक्ति-सिद्धान्त
ध्वनि-सिद्धान्त
रस-सिद्धान्त
यांव्यतिरिक्त औचित्य, अनुमिति, चमत्कृति, असे काही उपसिद्धान्त असूनही वरील पांच सिद्धान्त महत्त्वाचे असल्यामुळे त्यांना 'काव्यशास्त्रस्य प्रस्थानपञ्चकम्' असे सम्बोधिले जाते ।
या सिद्धान्तांच्या आधारे काव्यशास्त्राच्या विकासाचा थोडक्यात आढावा घेऊया :
उपलब्ध ग्रन्थांपैकी काव्यशास्त्रावरचा सर्वात प्राचीन ग्रन्थ म्हे० भरताचे नाट्यशास्त्र ।
इ०स०पू० 1ले ते इ०स० 1ले शतक असा या ग्रन्थाच्या रचनेचा ढोबळमानाने काळ आहे ।
भरताने नाट्यासाठी रससिद्धान्त मांडला ।
इ०स० 4थ्या शतकात भामह नावाच्या विद्वानाने काव्यालङ्कार हा ग्रन्थ लिहिला । त्याने साहित्याच्या सर्व प्रकारांचा विचार केला ।
इ०स० 5 व्या शतकात दण्डिन् याने काव्यादर्श ग्रन्थ सिद्ध केला ।
भामह आणि दण्डिन् दोघेही अलङ्कार-सिद्धान्ताचे प्रवर्तक मानले जातात ।
इ०स० 8/9 मध्ये वामन याने काव्यालङ्कारसूत्रवृतिः या ग्रन्थात गुणरीति-सिद्धान्त मांडला ।
त्यानन्तर रुद्रट, उद्भट, उय्यट, इ० विद्वानांनीही अलङ्कारशास्त्राची पुष्टी केली ।
त्यानन्तर आनन्दवर्धनाने आपल्या ध्वन्यालोक या ग्रन्थातून ध्वनि-सिद्धान्त प्रवर्तित केला।
इ०स० 10 व्या शतकात अभिनवगुप्त हा शास्त्रकार होऊन गेला । त्याने आनन्दवर्धनाच्या ध्वन्यालोकावर लोचन टीका आणि भरताच्या नाट्यशास्त्रावर अभिनवभारती टीका लिहिली । त्याने आनन्दवर्धनाच्या ध्वनिची भरताच्या रसाशी सांगड घातली, म्हू० तो रस सिद्धान्ताचा पुरस्कर्ता मानला जातो ।
कुन्तक हा अभिनवगुप्ताचा समकालीन होता। तो वक्रोक्ति-सिद्धान्ताचा पुरस्कर्ता असून त्याच्या ग्रन्थाचे नाव वक्रोक्तिजीवित असे आहे।
11 व्या शतकात मम्मटाने आपला काव्यप्रकाश हा ग्रन्थ रचला। ने कोणताही नवीन सिद्धान्त माण्डला नाही ।
त्याच्यानन्तर इतरही अनेक शास्त्रकार्ते होऊन गेले । त्यांचे ग्रन्थ व सिद्धान्त खालीलप्रमाणे :
विश्वनाथ - साहित्यदर्पण - रस सिद्धान्त ।
महिमभट्ट - व्यक्तिविवेक - अनुमिति सिद्धान्त (हा ध्वनि सिद्धान्ताचा विरोधक होता) ।
जगन्नाथ पण्डित (16 वे शतक) रसगङ्गाधर ध्वानि आणि रस सिद्धान्त ।
अन्य सर्व शास्त्रकार हे अलङ्कार सिद्धान्ताचे पुरस्कर्ते होते । पुढे अलङ्कार सिद्धान्ताचे प्राबल्य इतके वाढले की काव्यशास्त्रालाच अलङ्कारशास्त्र असे नामाभिधान मिळाले ।
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें