14 जुलाई 2010

MASK2 - 8(3) - Lec2 part B

भरताचे नाट्यशास्त्र
नाट्यशास्त्रामध्ये भरताने पाठ्य सुन्दर असण्याची गरज व्यक्त केलेली आहे । 'माधुर्य, प्रसाद, ओजस्' हे पाठ्याचे गुण सांगितलेले आहेत । त्याच प्रमाणे 'यमक, उपमा, रूपक, दीपक' असे चार काव्यालङ्कारही सांगितलेले आहेत । 'लक्षण' या संकल्पनेची सविस्तर चर्चा केलेली आहे । "काव्यबन्धास्तु कर्तव्याः षट् त्रिंशल्लक्षणान्विताः" असे त्याने म्हटलेले आहे । म्हणजे ३६ लक्षणांनी युक्त अशी काव्याची रचना असावी । ही लक्षणे भूषणसम्मितानि किंवा प्रबन्धशोभाकराणि असवीत ।
नाट्यशास्त्राच्या दोन वेगवेगळ्या आवृत्ती असून प्रत्येक अवृत्तीत वेगवेगळी 36 लक्षणे सांगितलेली आहेत, त्यामुळे लक्षणांची एकूण संख्या 72 झालेली आहे।
"
सम्यक्प्रयोज्यानि यथा रसम्" म्हे० पाठ्यातील मुख्य रसास योग्य ठरतील अशी लक्षणे वापरावीत असे भरत म्हणतो । अलङ्कार व लक्षणांनी रसाची शोभा वाढते । भरताने सांगितलेल्या या लक्षणांतूनच पुढे अलङ्कार निर्माण झाले ।

भामहाचा काव्यालङ्कार -
भामहाने अलङ्कार हा शब्द भाव आणि करण अशा दोन्ही अर्थांनी वापरलाय ।
" न कन्तमपि निर्भूषं विभाति वनितामुखम् " (स्त्रीचे मुख कितीही सुन्दर असो, ते अलंकारांशिवाय शोभत नाही) असे तो म्हणतो ।
अलङ्कार हा काव्याचा प्राण अहे असे तो मानतो । शब्द आणि अर्थ यांमध्ये वैशिष्ट्य म्हे० वक्रोक्ति पाहिजे असे त्यास वाटते । वक्रोक्ति म्हणजेच वैचित्र्य चमत्कृति अतिशय निराळेपणा इ० काव्याला आवश्यक आहेत । आणि हा अलङ्कार स्वभावतः सुन्दर पाहिजे तरच तो काव्यात सौन्दर्य आणेल ।
वक्रोक्तिबद्दल तो म्हणतो -
"वाचां वक्रार्थशब्दोक्तिरलङ्काराय कल्पते" (वचनांच्या विशिष्टरचनेचा उपयोग सुशोभीकरणासाठी केला जातो)
"कोऽलङ्कारोऽनया विना" (वक्रोक्तिशिवाय अलङ्कार कसा बरे होईल)
या ठिकाणि 'वक्रोक्ति' म्हे० एखादाच विशिष्ट अलङ्कार नसून, भावार्थाने वक्रोक्ति म्हे० शब्दार्थांची वैशिष्ट्यपूर्ण रचना, म्हणजेच 'अलौकिकत्व' 'असामान्यत्व' किंव 'लोकातिक्रान्तत्व'
भामहाच्या दृष्टीने 'लोकातिक्रान्तत्व हा अलङ्काराचा प्राण आहे', आणि त्यामुळेच एवढ्या एका निकषावर त्याने पूर्वीचे 'हेतु', 'सूक्ष्म' आणि 'लेष' हे तीन अलङ्कार अमान्य केले, कारण त्यांत असामान्यत्व नसल्याचे त्याचे मत आहे । भामहाने 38 अलङ्कार सांगितले ।

दण्डिन् याचा काव्यादर्श
दण्डीनेही अलङ्कार हा शब्द दोन्ही अर्थांनी वापरलाय । त्याने आधी वाङ्मयाचे दोन प्रकार सांगितले ते असे -
"द्विधा भिन्नं स्वभावोक्तिर्वक्रोक्तिरिति वाङ्मयम्"
'स्वभावोक्ति' म्हे० अखाद्या गोष्टीचे जसे आहे तसे वर्णन करणे म्हणजेच कोणत्याही अलङ्कारांशिवाय वर्णन करणे ।
'वक्रोक्ति' म्हे० उपमा, उत्प्रेक्षा इ० अलङ्कारांनी युक्त असे केलेले वर्णन
दण्डीने अलङ्काराची व्याप्ती वाढवली आणि काव्यला शोभा आणणाऱ्या सर्व गोष्टींचा समावेश अलङ्कार या संज्ञेत केला । उदा० छन्द, वृत्त, नाट्यकथेतील सन्धि, गुण, रस, इ० सगळे अलङ्कारच आहेत असे तो म्हणतो । आणि आपल्या संज्ञाविस्तारामुळे अलङ्कारांची संख्या अगणित होईल याची जाणीव असलेला दण्डी म्हणतो "कस्तान् कार्त्स्न्येन वक्ष्यति" कोण बरे त्यांची सम्पूर्ण सूची सांगू शकेल? कारण, "ते च अद्यापि विकल्प्यन्ते" अजूनही नवनवीन अलङ्कार कल्पिले जातायत (आणि भविष्यातही कल्पिले जातील) ।
दण्डीनेही अतिशयत्व हाच अलङ्काराचा प्राण मानला । त्याने स्वतः उपमादि 40 अलङ्कार सांगितले ।

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें